आमच्याबद्दल
दोन शास्त्रांवरउभे क्लिनिक
व्हीनस विमेन्स वेलनेस क्लिनिक हे वाकडमधील महिलांसाठीचे क्लिनिक आहे, जिथे आधुनिक स्त्रीरोगशास्त्र आणि शास्त्रीय आयुर्वेद एकाच ठिकाणी, एकाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली मिळतात.
चौधरी पार्क रोडवरील सुयोग स्पेसच्या पहिल्या मजल्यावर आमचे दोन कक्ष आहेत: तपासणी व सल्ल्यासाठी एक, आणि शिरोधारा, पंचकर्म व उत्तरबस्तीसाठी दुसरा. किशोरवयीन मुलींपासून गरोदर माता आणि प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर आम्ही महिलांची काळजी घेतो.
- पत्ता
- सुयोग स्पेस, चौधरी पार्क रोड, वाकड
- वेळ
- सकाळी १० – दुपारी २ · सायं. ५ – रात्री ९
- Google वर ४.९ · ३२ अभिप्राय

आमचे दोन कक्ष
आधुनिक तपासणी आणि आयुर्वेदिक उपचार — शेजारी शेजारी.



तुमच्या डॉक्टर
डॉ. माधवी तायडे
सल्लागार स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ
डॉ. माधवी तायडे या स्त्री आरोग्य क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या कुशल व संवेदनशील डॉक्टर आहेत. आधुनिक वैद्यकीय पद्धती आणि आयुर्वेदिक उपचार यांचा मेळ घालून त्या रुग्णांची सर्वांगीण काळजी घेतात. गर्भसंस्कार, नाडी परीक्षा आणि इन्फर्टिलिटी मॅनेजमेंट यांतील अतिरिक्त डिप्लोमांमुळे त्यांचा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने एकात्मिक आहे.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक स्त्रीरोग शस्त्रक्रिया केल्या व त्यांत सहाय्य केले, आणि ५०० हून अधिक नॉर्मल प्रसूती हाताळल्या. केवळ आजार बरा करणे नव्हे, तर शारीरिक, भावनिक व मानसिक समतोल राखत एकूण आरोग्य जपणे — हा त्यांच्या उपचारांचा केंद्रबिंदू आहे.
- १०+
- वर्षांचा अनुभव
- ५००+
- नॉर्मल प्रसूती
- १०००+
- रुग्ण
शिक्षण व प्रमाणपत्रे
- प्रगत प्रमाणपत्रासह गर्भसंस्कार डिप्लोमा
- नाडी परीक्षा
- इन्फर्टिलिटी मॅनेजमेंट
रुग्णालयीन अनुभव
- Birla Hospital, Thergaon
- Jupiter Hospital, Pune
- ONP (Oyster and Pearl) Leela Hospital, Pune
- Sanjivani Medipoint Hospital, Pune

उपचारांची पद्धत
वैयक्तिक उपचार
प्रत्येक स्त्रीची प्रकृती, वय, जीवनशैली व पुढील योजना पाहून उपचार ठरतो.
दोन्ही शास्त्रे, प्रामाणिकपणे
जिथे आधुनिक औषध हवे तिथे ते; जिथे आयुर्वेद पुरेसा तिथे तो — आणि दोन्हीचे कारण स्पष्ट.
सोबत राहणे
पहिल्या भेटीपासून प्रत्येक फॉलो-अपपर्यंत, प्रश्न विचारायला मोकळीक.
